| माणगाव | प्रतिनिधी |
जागतिक पातळीवरील ए. डी. सायंटिफिक इंडेक्स 2024 ने नुकत्याच जाहीर केलेल्या शास्त्रज्ञांच्या अद्ययावत क्रमवारीत लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या तब्बल 15 प्राध्यापकांचा समावेश झाला आहे.
ए.डी. सायंटिफिक इंजेक्स ही जर्नल्स आणि युनिव्हर्सिटीचे मूल्यामापन करणाऱ्या इतर पद्धतींपेक्षा वेगळ्या गुणांवर आधारित वैज्ञानिक कामगिरी आणि वैयक्तिक शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक उत्पादकेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित रँकिंग, विश्लेषण प्रणाली आहे. आपल्या संशोधन अभिरुचीला चालना देऊन संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. अशांचा अद्ययावत क्रमवारीत समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेच्या 15 प्राध्यापकांमध्ये गुणानुक्रमे डॉ.एस.एन. नलवलवार, डॉ.एस.ए. जाधव, डॉ.आर.एस. पावडे, डॉ.एन. अग्रवाल, डॉ. ब्रिजेश अय्यर, डॉ.एस.बी. देवसरकर, डॉ.व्ही.सी. सरगडे, डॉ.एम. सदय्या, डॉ.वाय.एस. महाजन, डॉ.बी.एफ. जोगी, डॉ.ए.बी. नांदगावकर, डॉ.ए. डब्ल्यू किवळेकर, डॉ.एच.ए. मुजावर, डॉ.व्ही.जे. कदम, डॉ.आर.पी. काटे यांचा समावेश आहे. यादीमधील प्राध्यापकांचा अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र विषयातील विविध संशोधनात्मक आंतरराष्ट्रीय साहित्याचा जागतिक पातळीवर विशेष प्रमाणपत्रावर संदर्भ घेतलेला आहे.