| उरण | प्रतिनिधी |
एमएमआरडीएच्या प्रस्तावित तिसरी मुंबई प्रकल्पाविरोधात 1 जुलै रोजी कोकण आयुक्तालयावर होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी राज्य शासन आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 10 ते 15 दिवसांत बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर एमएमआरडीए तिसरी मुंबई विरोधी 124 गाव संघर्ष समितीने हा निर्णय घेतला.
कोकण भवन येथे विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत संघर्ष समितीने शेतकऱ्यांच्या जमिनींसंदर्भातील प्रश्न मांडले. त्यानंतर आयुक्तांनी शासनस्तरावरील बैठक लवकर घेण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर पाणदिवे येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत सर्वानुमते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आश्वासनानुसार 10 ते 15 दिवसांत बैठक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे.
1 जुलैचे आंदोलन स्थगित
