20 लाखांचे पॉलिस्टर यार्न लंपास

। जेएनपीटी । वार्ताहर ।
इंडोनेशिया येथून आयात केलेल्या 35 लाखाच्या पॉलिस्टर यार्न पैकी 20 लाख किंमतीचे पॉलिस्टर यार्नचा अपहार झाल्याचा प्रकार नुकतेच जेएनपीटी बंदरातील एका आयात निर्यात करणार्‍या कंपनीत उघडकीस आला आहे. हा माल उरण येथील एका सीएफएसमध्ये ठेवण्यात आला होता. तेथून हा माल सुरत येथे पाठविण्यात येणार होता. मात्र सुरत येथे पाठवत असताना ट्रेलर चालकाने या कंटेनर मधिल 21 लाख 84 हजार 766 रूपये किंमतीचा 12666 किलो वजनाचे पॉलिस्टर यार्न परस्पर विकून मालाचा अपहार केला आणि ट्रेलर आणि कंटेनर रस्त्यातच सोडून हे दोन्ही ट्रेलर चालक फरार झाले. संजय चरण सिंग आणि विजय शर्मा अशी या दोन ट्रेलर चालकांची नावे आहेत. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरू आहे.

Exit mobile version