| अमेरिका | वृत्तसंस्था |
अवघ्या काही महिन्यानंतर टी 20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. आता या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांची यादी देखील समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. 20 वा संघ युगांडा ठरला आहे. 20 वा संघ पात्र झाल्यानंतर आयसीसीने या स्पर्धेचे स्वरूपदेखील जाहीर केले आहे. 20 संघांपैकी 10 संघ थेट आयसीसी क्रमवारीच्या आधारे निवडले गेले. उर्वरित 10 संघांची निवड विविध विभागांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पात्रता फेरीतून करण्यात आली आहे.
टी 20 विश्वचषक 2024 चे स्वरूप खूपच भारी आहे. यामध्ये प्रथम 20 संघांना प्रत्येकी 5 च्या चार गटात विभागले जाईल. या सर्व गटांतील अव्वल 2 संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर 8 फेरीत सर्व संघ 4-4 गटात विभागले जातील. यापैकी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचा सामना बाद फेरीचा असेल. दोन्ही विजयी संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम फेरीत उभय संघांमध्ये चुरशीची लढत होणार असून त्यातून टी-20 विश्वचषकाचा विजेता निश्चित होईल.
पात्र ठरलेले संघ
वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.