खालापुरमध्ये 210 घरांची पडझड ; पाताळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खोपोली | संतोषी म्हात्रे |

             रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात जलमय परिस्थिती निर्माण झाली.पाताळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडून पुलावरून पाणी गेल्याने. वाहन चालकाने पुलावरून वाहने नेवू नये याकरता पोलीस कर्मचारी पुलावर तैनात करण्यात आले होते.  नदी काठच्या गावांना सतर्कनेचा इशारा दिला आहे.कर्जत खोपोली रेल्वे रुळावर पाणी आले असून रेल्वे रुळाच्या खालची मातीचा काही भाग पाण्यात वाहून गेल्याने कर्जत खोपोली रेल्वे सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.खालापूर तालुक्यातील 150 तर खोपोली शहरातील 60 च्या आसपास घरांची पडझड झाली आहे.15 ते 20 इमारतींच्या संरक्षण भितीं पडून पहिल्या मजल्यापर्यत पाणी घसून मोठे नुकसान झाले आहे.दि.21 जुलै रोजी संध्याकाळपासून दि.22 जुलै च्या सकाळपर्यत 73 मिली.इंच पावसाची नोंद झाली आहे.दुपारपर्यंत संथ पाऊस असला तरी संध्याकाळी पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे

           रायगड जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असताना दि.21 जुलै रोजी संध्याकाळपासून दि.22 जुलै च्या सकाळपर्यत 73 मिली.इंच पावसाची नोंद होत धुव्वाधार पाऊस कोसळत मौजे-खोपोली येथील सिध्दार्थनगर 27 कुटुंब व प्रज्ञानगर मधील 26 कुटुंबातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते तेथील एकुण 53 कुटुंबाला सिध्दार्थ नगर येथील बुद्ध विहारामध्ये व आजुबाजुच्या उंचीवरील घरामध्ये तर भाऊ कुंभार चाळीतील कुटूंबांना स्थंलातरीत करण्यात आले आहे.विणानगर,काटरंग,गुलशन,डीसीनगर,पटेेल नगर परिसरात पाणी घुसले असून 15 ते 20 इमारतींच्या संरक्षण भिती कोसळून पुराचे पाणी पहिल्या मजल्यात जात घरातील मोठे नुकसान झाले असून पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने इमारतीमधील चारचाकी,दुचाकी वाहने पाण्यात बुडत नुकसान झाले आहे.खोपोली बाजारपेठ येथे राहणारे वल्लभ मजेठीया यांच्या घराची भिंत कोसळली असून यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, तसेच मौजे-जांबरूग बौध्दवाडा ,बीडखुर्द गावामध्ये सुद्धा पाणी शिरले होते तेथील कुंटुंबाना रा.जि.प.शाळेमध्ये स्थंलातरीत करण्यात आले आहे.सदर घटनेमध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नसुन मौजे-जांबरूग येथील एका व्यक्तीला किरकोळ इजा झाली होती त्यास उपचारासाठी प्राथमिक अरोग्य केंद्र खालापुर येथे तहसिलदार चप्पलवार यांनी हालविले.

      तहसिलदार इरेश चप्पवार,नायब तहसिलदार कल्याणी कदम यांनी रात्रभर तालुक्यासह खोपोली शहरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून तहसिलदारांनी रात्रीच आदिवासी कुटूंबांना कपडे,ब्लकेट खाऊची व्यवस्था केली.खोपोलीचे मुख्याधिकारी गणेश शेटे,नगराध्यक्षा सुमन औसरमल,खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे,माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम सकाळपासून पूरपरिस्थीची पहाणी करीत नियोजन करीत आहेत.

Exit mobile version