रायगड जिल्ह्यात 22 रुग्ण; शुन्य मृत्यू

31 कोरोनामुक्त, 11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात तब्बल 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 11 तालुक्यांमध्ये नव्याने एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 14, पनवेल ग्रामीण 2, कर्जत 4, पेण 1, रोहा 1 असे एकूण 22 रुग्ण आढळले. तसेच उरण, खालापूर, अलिबाग, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड आणि पोलादपूर या 11 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 773 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 992 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 567 वर गेला आहे. सद्यस्थितीत 214 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version