38 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 23 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 26 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये नव्याने एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 17, पनवेल ग्रामीण 4, उरण 1, पेण 1, अलिबाग 2, माणगाव 1 असे एकूण 26 रुग्ण आढळले. तसेच खालापूर , मुरुड, कर्जत, रोहा, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 861 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 083 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 571 वर गेला आहे. सद्यस्थितीत 207 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.