कोंबिंग ऑपरेशन दरम्यान 27 किलो गांजा जप्त

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तळोजा पोलिसांनी देवीचा पाडा येथे सापळा लावून 27 किलो गांजा आणि 14 किलो भांगेच्या गोळ्या असा एकूण 34 लाख 22 हजारचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दि. 12 ते 13 मार्चदरम्यान रात्री तळोजा पोलिसांनी तळोजा परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले. यावेळी देवीचा पाडा येथे मधुकर म्हात्रे यांची चाळ, रूम नंबर चार या ठिकाणी छापा टाकून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी सागर चिंतामणी महंतो (60), सावित्री सागर महंतो (48) या दोघांना अटक करण्यात आली. तसेच कोंबिंग ऑपरेशन दरम्यान बेकायदा दारू विक्री प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. मोटर वाहन कायद्यान्वये 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच दोन बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

Exit mobile version