मुंबई-पुणे महामार्गावर ३ तासांचा ब्लॉक; करा ‘या’ मार्गाचा वापर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबई-पुणे जलदगती महामार्गावर जर तुम्ही प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या महामार्गावर ३ तासांचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे.

आज गुरुवारी (दि.30) या महामार्गावर दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेतला जात असून हा मार्ग ३ तासांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. मुंबई-पुणे एजलदगती महामार्गारील खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावरील पुलासाठी 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार असल्याने तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. यासाठी या मार्गावरील वाहतूक खालापूर टोल नाक्याजवळील पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. पुण्याहून मुंबईकडे वाहतूक खालापूर टोलनाका येथे 1 किलोमीटर अंतरासाठी पुणे लेनवरून वळविण्यात आलेली आहे.

Exit mobile version