देशात चोवीस तासात 3 लाख नवे रुग्ण

कोरोनामुळे 439 रुग्णांचा मृत्यू
| मुंबई | वृत्तसंस्था |
देशभरात कोरोना परिस्थिती गंभीर होत असताना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात देश 3 लाख 6 हजार 64 रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या कालपेक्षा 27 हजार 469 ने कमी आहे. भारतात कोरोना संसर्गात घट झाल्याचं दिसतंय. नव्याने समोर आलेली आकडेवारी 20 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेटसह समोर आली असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, नवीन आकडेवारी रविवारी नोंदवल्यापेक्षा 27 हजार 469 ने कमी होती. मात्र दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 17.78 टक्क्यांवरून 20.75 टक्क्यांवर पोहोचला. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 14,74,753 चाचण्या घेण्यात आल्या आहेत तर रविवारी चाचण्यांची संख्या 18,75,533 वर गेली आहे.

Exit mobile version