अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 31 नवे रुग्ण

5 जणांचा मृत्यू 70 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज सोमवारी 5 जुलै रोजी कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 70 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 734 झाली आहे. यापैकी 483 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 15 हजार 045 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 206 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version