रायगड जिल्ह्यात 31 रुग्ण; एकाचा मृत्यू

11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
18 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 15 डिसेेंबर रोजी कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 11 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 19, पनवेल ग्रामीण 4, खालापूर 2, कर्जत 4, अलिबाग 2 असे 31 रुग्ण आढळले. तसेच उरण, पेण, रोहा, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 11 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 353 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 564 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 580 वर गेला आहे. सद्यस्थितीत 209 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version