४४ कोरोना मुक्त: जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुरूवारी रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यामध्ये ३२ रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांनी दिली.
गुरूवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात १३, पनवेल ग्रामीण ४, कर्जत ३, पेण ४, अलिबाग ४, माणगाव १, रोहा १, महाड २ असे ३२ रुग्ण आढळले. तसेच पनवेल मनपा क्षेत्रातील २३, पनवेल ग्रामीण ४, पेण ५, अलिबाग ९, माणगाव १, श्रीवर्धन २, अशा एकूण ४४ रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७०८ झाली आहे. यापैकी २ लाख २१ हजार ७१८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा ४ हजार ७९८ झाला आहे. सद्यस्थितीत १९२ सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात ३२ कोरोना रूग्ण: एका रुग्णाचा मृत्यू
