रायगड जिल्ह्यात 34 रुग्ण; शून्य मृत्यू

18 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 25 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 34 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात तब्बल 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये नव्याने एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गुरुवारी पनवेल महापालिका हद्दीत 17, उरण 1 कर्जत 1, पेण 12, अलिबाग 2, माणगाव 1 असे एकूण 34 रुग्ण आढळले. तसेच पनवेल ग्रामीण, खालापूर , मुरुड, रोहा, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड आणि पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 925 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 130 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 573 वर गेला आहे. सद्यस्थितीत 222 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version