| इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 36 जण ठार आणि 50हून अधिक जखमी झाले. वायव्य पाकिस्तानी शहरात शुक्रवारच्या सभेदरम्यान गर्दीने भरलेल्या शिया मशिदीमध्ये बॉम्ब घडवून आणला गेला. यात किमान 50 जण जखमी झाले, असे अधिकार्यांनी सांगितले. 10 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज पडण्यात येत होता. त्यावेळी हा स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी तात्काळ कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.