शरदवाडी येथील 40 वर्षीय महिला बेपत्ता

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातून बेपत्ता होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील शरदवाडी येथील एक विवाहिता महिला महिन्याभरापासून बेपत्ता आहे. किराणा सामान आणायला जाते असे सांगून गेलेली ही महिला अद्याप घरी आलेली नाही. महिलेला कोणी पाहिले असल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन पाली पोलीसांनी केले आहे.

सदर महिलेचे नाव देवकी चिमा पांगारे (वय 40 वर्ष) पालीला किराणा सामान आणायला जाते, असे आपल्या मुलाला संकेत याला सांगून 9 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता आपल्या घरातून निघून गेल्या आहेत. त्या अद्याप घरी परतलेले नाहीत. या संदर्भात चिमा पांगारे यांनी 24 सप्टेंबरला पाली पोलीस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार एस एम. परदेशी करीत आहेत.

Exit mobile version