जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 456 नवे रुग्ण; 10 जणांचा मृत्यू तर 517 कोरोनामुक्त

अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात मंगळवारी 13 जुलै रोजी कोरोनाच्या 456 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 517 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
 
आज पनवेल शहरात 132, पनवेल ग्रामीणमध्ये 56, अलिबागमध्ये 95, खालापूरमध्ये 32, उरणमध्ये 13, पेणमध्ये 29, महाडमध्ये 22, कर्जतमध्ये 16, रोह्यात 19, मुरुडमध्ये 2, माणगावमध्ये 24, म्हसळ्यात 8, सुधागडमध्ये 5, श्रीवर्धनमध्ये 8, पोलादपूरमध्ये 6 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर आज तळा तालुक्यामध्ये एकही संसर्गित रुग्ण आढळला नाही.
 
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 273 झाली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 109 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 781 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 383 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Exit mobile version