अलिबागमध्ये सोमवारी 48 नवे रुग्ण

तिघांचा मृत्यू; अलिबाग तहसीलदारांची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यात सोमवारी 14 जून रोजी 48 नव्या रुग्णांची नोंद झाली असून तीन रुग्ण उपचारादरम्यान दगावले. तर दिवसभरात 165 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 771 झाली आहे. यापैकी 429 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13 हजार 243 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 099 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version