5 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा कमवून देतो, असे सांगून 5 लाख 15 हजार रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गणेश शंकर पोखरकर (रा. मयूर पार्क, सेक्टर 36, कामोठे) याच्याविरुद्ध कामोठे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक बाबुराव तिवरेकर हे सेक्टर 7, कामोठे येथे राहत असून त्यांनी दहा वर्षांपूर्वी शेअर खरेदी केले होते. डिमॅट खात्यामध्ये ते दिसत नव्हते म्हणून त्यांनी शेअर ब्रोकरचा शोध घेतला. यावेळी त्यांना अमित कारले व गणेश पोखरकर हे भेटले. शेअर खान कंपनीमध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी डिमॅट खाते काढण्यास सांगितले. त्यांच्याकडे ॲक्सिस बँकेचे डी मार्ट खाते असल्याचे सांगून देखील त्यांनी आणखी एक डिमॅट खाते काढा असे सांगितले. त्यानुसार शेअर खानमध्ये डिमॅट खाते काढण्यास सांगून त्यांनी डी मॅट खाते उघडले. डिमॅट खात्यामधून ट्रेडिंग करून जास्त नफा कमवून देतो असे सांगून त्याची माहिती त्यांनी अमित कारले व गणेश पोखरकर यांना दिली.

अमित कारले व गणेश पोखरकर हे त्यांच्या घरी येऊन बँक खात्यातून डी मॅट खात्यात पैसे पाठवत असत व शेअरची खरेदी विक्री करत असत. असे मिळून एकूण 23 लाख 15 हजार रुपये गणेश पोखरकर यांनी बँक खात्यातून शेअर खानच्या डिमॅट खात्यात जमा करून घेतले. काही दिवसांनी त्यांनी ॲक्सिस बँकेचे खात्यावरील व्यवहार तपासून पाहिले असता खात्यातून 5 लाख 15 हजार हे गणेश पोखरकर यांनी स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले असल्याचे समजले. पोखरकरकडे त्यांनी पैसे परत मागितले असता त्यांनी पैसे परत दिले नाहीत. त्याने 3 लाखाचा चेक दिला मात्र तो चेक बँकेत टाकू नका असे सांगितले. त्यानंतर पुन्हा चेक बँकेत टाकू का, असे विचारले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गणेश शंकर पोखरकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version