कमी पटसंख्येच्या निकषावर 50 शाळा होणार बंद

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शिक्षण ही मानवी जीवनातील जरी मुलभूत गरज असली तरी, ती गरज भागविणारी संकुले सद्यःस्थितीत अखेरचा श्‍वास घेत आहेत. अलिकडच्या काळात शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्यातील मुले लगतच्या शाळेत वर्ग करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी झाल्यास राजापूर तालुक्यातील 50 शाळांना त्याचा फटका बसून या शाळा बंद होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या विविध कारणांमुळे रोडावत आहे. काही शाळा शून्य पटसंख्येच्या झाल्या असून काही शाळांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या झाली आहे. पटसंख्या कमी झाली असून त्या शाळेमध्ये भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यातील खर्चामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. दुसर्‍या बाजूला कमी पटसंख्येमध्ये विविधांगी उपक्रम राबवण्यामध्ये अडचणी येत असल्याने मुलांच्या व्यक्तीमत्व विकासाच्यादृष्टीने फारशी चालना मिळताना दिसत नाही.
अशा शाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव, हस्तकला आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना फारसा वाव मिळत नाही. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून सद्यःस्थितीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना जास्त पटसंख्या असलेल्या लगतच्या शाळांमध्ये वर्ग करण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावरून अंमलबजावणीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.
राजापूर तालुक्यात आडवली क्र. 2, आडवली क्र. 3, बारसू क्र. 1, बारसू क्र. 2, पन्हळे बाग (ऊर्दू), बांदीवडे, भंडारसाखरी, चिखलगाव वरची जड्यारवाडी, देवाचेगोठणे ठोंबरेवाडी, देवीहसोळ क्र. 2, देवीहसोळ क्र. 3, दोनिवडे कातळवाडी क्र. 3, धाऊलवल्ली क्र. 6, फुपेरे लिगमवाडी क्र. 3, गोवळ क्र. 1, गोठणेदोनिवडे क्र. 4, कोतापूर क्र. 4, हसोलतर्फ सौंदळ क्र. 2, हातदे क्र. 2, हातिवले क्र. 2, हुर्से, जुवे जैतापूर, कळसवली क्र. 2, केळवली क्र. 7, कोळवणखडी क्र. 2, ओणी क्र. 5, खरवते क्र. 3, डोंगर ऊर्दू, मूर क्र. 3, मूर क्र. 4, नाटे पडवणे, निवेली, गोठणेदोनिवडे क्र. 6, पाणेरे, वडदहसोळ क्र. 5, प्रिंदावण तळेखाजण, देवाचेगोठणे केळंबेकरवाडी, रूंढेतळी, ससाळे क्र. 2, साखरकोंबे, साखर मिरगुले पाखाडी, शेंबवणे क्र. 2, तळगाव क्र. 2, ताम्हाणे धनगरवाडी क्र. 6, वेत्ये, वडदहसोळ क्र. 6, विल्ये क्र. 3, विल्ये क्र. 4, विखारेगोठणे क्र. 2, येळवण क्र. 2. या शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा आहेत.

Exit mobile version