पाण्यात बुडून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातील साले गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ डबक्याच्या पाण्यात बुडून एका ५० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.५) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती खरीवली येथील सुरज संदीप जुमारे (वय २४) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सुरज संदीप जुमारे यांचे सासरे नथुराम रोंगु भोनकर (वय ५०) यांचा साले गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या डबक्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर पुढिल तपास करीत आहेत.

Exit mobile version