अलिबाग तालुक्यात शुक्रवारी 7 जणांचा मृत्यू

दिवसभरात 83 रुग्ण कोरोनामुक्त; अलिबाग तहसीलदार यांची माहीती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यात आज शुक्रवारी 11 जून रोजी कोरोनाच्या 123 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 83 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने सात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 486 झाली आहे. यापैकी 423 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 12 हजार 823 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 240 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version