जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मंगळवारी रायगड जिल्ह्यातील १० तालुक्यामध्ये ७१ रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात ९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात ३१, पनवेल ग्रामीण ६, उरण २, खालापूर ३, कर्जत २, पेण ११, अलिबाग ६, मुरुड १, माणगाव ४, रोहा ४ तर पोलादपूर १ असे ७१ रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील ३१, पनवेल ग्रामीण ८, उरण २, खालापूर ७, कर्जत १०, पेण ४, अलिबाग ९, माणगाव १०, तळा १, रोहा ३, म्हसळा ४, आणि पोलादपूर १ अशा एकूण ९० रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरीना बाधित रुग्णांची संख्या २ लाख २२ हजार ०४५ झाली आहे. यापैकी २ लाख १६ हजार ९९९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा ४ हजार ७०५ झाला आहे. सद्यस्थितीत ३४१ सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.