अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 72 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू तर 104 रुग्ण कोरोनामुक्त

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात आज रविवार दिनांक 11 जुलै रोजी कोरोनाच्या 72 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 104 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 हजार 255 झाली आहे. यापैकी 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 15 हजार 551 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 212 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

Exit mobile version