| माथेरान | वार्ताहर |
स्वातंत्र्यदिनाच्या पंचाहत्तरीनिमित्ताने माथेरानमध्ये सर्वत्र घरोघरी तिरंगे मोठ्या दिमाखात डौलत होते. दि. 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांसाठी सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून देशभक्तीची भावना जागृत ठेवली. स्वतःच्या घरावर स्वतः लावलेल्या तिरंग्याचा अभिमान नागरिकांच्या चेहर्यावर दिसून येत होता. स्वातंत्र्यदिनी नेहमीप्रमाणे विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी 09.5 वा. अधीक्षक कार्यालय येथे अधीक्षक दिक्षात देशपांडे यांच्या हस्ते, तर नगरपरिषद कार्यालयाच्या समोर येथे प्रशासक सुरेखा भणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सुरवातीला माथेरानचे प्रभारी पोलीस सहायक निरीक्षक शेखर लव्हे यांच्या पोलीस स्टाफने तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी डॉ. रुपाली मिसाळ, मुख्य नर्स, स्नेहा गोळे यांनी कोव्हिड काळात उत्तम कामगिरी बजावली. त्याची दखल घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशस्तीपत्रक पाठवून या सेविकांचा सन्मान केला आहे. त्याबद्दल प्रशासक सुरेखा भणगे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.