। अलिबाग । वार्ताहर ।
नुकतेच मोदी सरकारने कृषी कायद्या विषयासंबंधित तीन कायदे रद्द केले आहेत, यामुळे देशातील सर्व शेतकर्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सर्व स्तरातील शेतकर्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. शेतकर्यांनी या आंदोलनात दिलेल्या बलिदानाचे फळ म्हणून तीन कृषी कायदे रद्द झाले असे म्हणता येईल. याच पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील चरी ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे चरी शेतकरी संपाचा वर्धापन दिन सोहळा 27 नोव्हेंबर रोजी आ. जयंत पाटील व चरी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच निलम प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील त्याचबरोबर आ. पंडित पाटील, रा.जि.प सदस्य आस्वाद पाटील, रा.जि.प सदस्य भावना पाटील, रा.जि.प सदस्य चित्रा पाटील, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर, मिनल माळी, चित्रलेखा पाटील, पं.स. सदस्य सुधीर थळे, समाज कल्याण अधिकारी प्रमोद जाधव, पं.स.सदस्य प्रकाश पाटील हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत.