महाड | प्रतिनिधी |
पोलादपूर-माणगाव दरडग्रस्त निधी संकलन समिती, मुंबई यांच्या वतीने महाड-पोलादपूर तालुक्यातील गावांमधील आपद्ग्रस्तांना आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी संपर्कप्रमुख सुभाष पवार, किशोर जाधव, जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे, जितेंद्र सावंत, अंबरनाथ नगरपालिका नगरसेवक सुभाष साळुंखे, संपर्क प्रमुख इक्बाल चांदले, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, प्रमोद गोगावले, एकनाथ सुकूम, तुळशीराम पोळ आणि इतर ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व शिवसैनिक आणि निधी संकलन समिती मधील सदस्य इत्यादी उपस्थित होते.
या मदतीचे वाटप हे महाड तालुक्यातील तळीये येथून करण्यात आले, त्यानंतर पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त भागात जाऊन या समितीने एका कुटुंबास तीस हजार, वीस हजार रोख अशी आर्थिक मदत केली.