इमारत मोजतेय अखेरची खटीका
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब ग्राम पंचायतीच्या हद्दीत गेली तीन चार वर्षापूर्वी नव्याने उभारलेली भाजी मंडई इमारत झाडी गवताच्या विळख्यात सापडली असून ती अखेरची घटकेत आहे की काय, हेच चित्र बाजारात बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यास मिळत आहे. त्यामुळे आता खांब ग्राम पंचायतीची विकासाबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेला खांब नाक्यावरील बाजार पेठेची ओळख ही ब्रिटिश राजवटीपासून असल्याचे नेहमी बोलले जात आहे. सदैव रहदारीने गजबजलेला या मार्गावरील ठिकाण म्हणजे खांब आणि वरसगाव नाका हे असले तरी कायम विकास कामे आणि आणि सुशोभीकणापासून वंचित आहे. सदैव गजबलेली खांब बाजारपठेत पंचवीस ते तीस गावांचा समावेश येतो त्यासाठी बाजारपेठेत एकाच ठिकाणी ग्राहकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी तेथील ग्राम पंचायत हद्दीत तसेच खांब नाक्यावर विविध योजने अंतर्गत भाजी मंडई इमारत उभारण्यात आली. बहुचर्चेत आसलेल्या खांब ग्राम पंचायतीची मोठी उलाढाल असल्याने तसेच स्थानिक नेत्यांचेही कृपाशीर्वादाने असल्याने विकास कामांची खैरात मात्र केलेली विकास कामे ही किती काळ तक धरू शकतात, यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
मागील तीन चार वर्षापूर्वी येथील ग्राम पंचायत हद्दीत विवीध विकास कामांसाठी ग्राम सेवक कॉटर्स पाडून दुसऱ्या ठिकाणी असलेले हे भाजी मार्केट त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आले. तदनंतर कोरोनाची लाट सरू झाली इमारत झाली मात्र त्यात भाजी मार्केट सुरूच झाले नसल्याने, तसेच ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे लाखो रुपये शासनाचे खर्च करून बांधण्यात आलेला भाजी मार्केट इमारत गवताच्या व झाडांच्या विळख्यात सापडली असल्याने तीची दुरवस्था झालेली दिसत येते आहे.