| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुंबईत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी सहभाग घेणार नसल्याच्या चर्चा होत्या. पण आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपण या बैठकीला हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळं आप आणि काँग्रेसमधला वाद मिटल्याचं बोललं जात आहे.