पादचार्यांना अनेक अडचणींचा सामना
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ विद्या मंदिर शाळेच्या अलीकडे कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर एका भंगारवाल्याकडून राज्यमार्ग रस्त्याची एक लेन भंगार रस्त्यावर साठवून बंद केली आहे. त्या ठिकाणी दुपदरी रस्ता संपत असून, विद्यार्थी या रस्त्याचा वापरत करत असतात. परंतु, तेथील भाग रस्त्यावर भंगार साठवून ठेवल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
कर्जत कल्याण रस्त्यावर नेरळ आणि ममदापुर ग्रामपंचायत यांच्या हद्दीवर रस्त्याच्या एका लेनवर भंगार साठवून ठेवले जात आहे. काही ठिकाणी राज्यमार्ग रस्ता हा दुपदरी असून, ज्या ठिकाणी हा राज्यमार्ग रस्ता एकेरी बनतो. त्याच ठिकाणी भंगार साठवून ठेवण्यात येत आहे. दुपदरी रस्ता एकेरी झाल्यानंतर तेथे असलेल्या उताराच्या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात एकेरी रस्त्याची एक लेन तेथील भंगार व्यावसायिकाने भंगार साठवून बंद केली आहे. त्यात त्या भागात दोन शाळा असून, त्यातील नेरळ विद्या मंदिर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि सिनियर महाविद्यालय असे साधारण तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निम्मे विद्यार्थी याच रस्त्याने पायी ये-जा करीत असतात. याच रस्त्यात भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. त्याच्या अलीकडे अँग्लो उर्दू शाळा असून, तेथेदेखील 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे अपघाताची स्थिती वाढली आहे. दरम्यान, तेथे साठवून ठेवण्यात आलेले भंगार हे काही महिन्यांपासून तसेच पडून आहे. त्या ठिकाणी रस्त्याची एक लेन अडवून ठेवलेली असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम खात्याने अधिकारी आठवड्यातवून एका दोनदा या रस्त्याने प्रवास करीत असतानादेखील बांधकाम खात्याच्या अधिकार्याकडून आपल्या रस्त्याची लेन बंद झालेली पाहून कोणतीही कारवाई केली जात नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचवेळी रस्त्याची एक लेन अडवून भंगाराच्या साठा करणार्यांवर करावीच होत नाही. त्यामुळे या भंगार वाल्याला आशीर्वाद कोणाचा आहे, असा प्रश्न स्थानिकांकडून विचार जात आहे.
कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ विद्या मंदिर शाळेच्या बाजूला डांबरी रस्त्याच्या एका भागात भंगार साठवून ठेवण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याकडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पाटील हे आजच त्या ठिकाणी कारवाई करतील.
संजीव वानखेडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग