भारताच्या संघात एक बदल
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये विश्वचषकाचा सामना सुरु आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघ प्रथम गोलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दारुण पराभवानंतर, अफगाणिस्तानचे दिल्लीमध्ये परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य असेल.
भारतीय संघात एक बदल भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. खेळपट्टी पाहून भारतीय संघाने शार्दूल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे. अश्विन याला प्लेईंग 11 मधून आराम देण्यात आला आहे.
अफगाणिस्तानची प्लेईंग 11 रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक़, मुजीब उर रहमान, फजलहक़ फारुकी. भारताची प्लेईंग 11 रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.