अलिबाग येथे पोलिस हुतात्मा दिन साजरा
| रायगड | प्रतिनिधी |
शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी रायगड पोलिस दलातर्फे हुतात्मा दिन पाळण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
रायगड पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस शहीद स्मारकास सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक संजय सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. सन 2022-2023 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या एकूण 188 शहीदांना आदरांजली म्हणून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. हुतात्मा परेड करिता मुख्यालयातील राखीव पोलिस निरीक्षक परेड कमांडर विजय बाविस्कर यांच्यासह पोलिस जवान, पोलिस बॅण्डपथकाने मानवंदना दिली.






