| पनवेल | वार्ताहर |
दिशा कल्चरल इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन खांदा कॉलनी येथील बेल्लेझा बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर व मृदुला पुसाळकर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मृदुला पुसाळकर, भागीरथी कोळकर, अस्मिता अभिजित पाटील, निशा गुडे वैदू, डॉ. शर्वरी शैलेश पाटणे, संपादिका कविता लाखे जोशी, ॲड. सौ सुरेखा प्रशांत भुजबळ, मयुरा राजेश, डॉ. प्रीती प्रसाद महाजन या नवदुर्गाना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पनवेलमधील पटेल ज्वेलर्सतर्फे सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू ही देण्यात आली. यावेळी प्रतीक्षा डायेस, डॉ. शिल्पा भंडारवार, डॉ. अमित भंडारवार, साहिल रेळेकर, प्रतीक चव्हाण, सुरेश मोरे या मान्यवरांच्या सहकार्यामुळे सोहळा यशस्वी झाला. या कार्यक्रमास तेजस पाटील, प्रीती गायकर, अंजली साखरे, किरण राजपूत उपस्थित होते.