। पनवेल । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींचे मतदान आज होत असून रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळच्या या सत्रात मतदानाची गती संथ असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
त्यातच प्रशासनाकडून पनवेल तालुक्यातील देवद ग्रामपंचायत निवडणुकीच्या केंद्रावर दिव्यांग करता कोणतीही सोय केली नसल्याने त्यांच्या नातेवाइकना स्वःत उचलून मतदान केंद्रावर आणून मतदान करावे लागत आहे. त्यामुळे दिव्यांगांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मतदान करतेवेळी खूप हाल होत आहेत.