टोकियो | वृत्तसंस्था |
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा तिरंदाज राकेश कुमारने वैयक्तिक खेळातील अप्रतिम कामगिरीनंतर मिश्र गटातही उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने ज्योति बालियानसह मिळून थायलंडच्या जोडीला मात देत उपांत्य पूर्व फेरीमध्ये जागा पक्की केली आहे. राकेशने आतापर्यंत शानदार प्रदर्शन करत पॅरालिम्पिक खेळांमध्ये पुरुष वैयक्तिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीमध्ये जागा मिळवली आहे. दुसरीकडे तिरंदाज श्याम सुंदर स्वामी हा दुसर्या फेरीतून बाहेर गेला आहे. पात्रता फेरीत 720 पैकी 699 गुण मिळवत 36 वर्षीय राकेशने शनिवारी हाँगकाँगच्या चुएन एंगाइ ला 13 गुणांनी पराभूत केलं.