| अलिबाग | प्रतिनिधी |
नवखार येथील घर व रिसॉर्टची रविवारी सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. फिर्यादी व आरोपीमध्ये यापूर्वी झालेल्या आर्थिक व्यवहाराच्या रागातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील नवखार येथील फिर्यादींच्या रिसॉर्टच्या जागेत रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीने येऊन तेथील खिडक्या दरवाजाचे किचन, खुर्ची, टेबल अशा वेगवेगळ्या साहित्यांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरात घुसून कपाट, बेड आदी वस्तूंचे नुकसान केले. तसेच काम करणाऱ्या महिलेलादेखील शिवीगाळी करून ठार मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहेत.