| सुधागड-पाली | वार्ताहार |
रायगड जिल्हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे येथे माकडे, डुक्कर पक्षी असे प्राणी विपुल प्रमाणात आढळतात. मात्र या प्राण्यांमुळे शेतीचे व परसबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. माकडे व वानरे तर गावसह शहरात देखील धुडगूस घालताना दिसतात. यांना पिटाळून लावण्यासाठी पीव्हीसी पाईपचे एक देशी उपकरण सध्या जिल्ह्यात विक्रीसाठी आले आहे, हे उपकरण खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे.
प्लास्टिकच्या पाईपपासून बनविलेले हे उपकरण हाताळण्यास सोपे आहे. यामध्ये एका छोट्या होलमधून कॅल्शियम कार्बाईडचा छोटा तुकडा टाकून त्यावर थोडे पाणी टाकून एक किंवा दोनदा पाईप हलवायचा व त्यानंतर लावलेले लायटर दबायचे आणि लागलीच पाईपमधून मोठा आवाज निघतो. या आवाजाने माकडे, डुक्कर व इतर वन्य पशुपक्षी पळून जातात. त्यांना कोणतीही दुखापत होत नाही. हे उपकरण घेऊन येणारे विक्रेते बाजार सर्वांना याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. त्यामुळे अनेक लोक कुतूहलाने या विक्रेत्याकडून हे उपकरण विकतही घेतात.
पाली शहरात माकडे व वानरांचा खूप उपद्रव वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करावा हाच मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या उपकरणामुळे त्यांचा बंदोबस्त होऊ शकतो.
तरुण, पाली