| रसायनी | वार्ताहर |
पत्रकार मनोज कळमकर यांच्या मातोश्री प्रभावती मधुकर कळमकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. अतिशय धार्मिक वृत्तीच्या प्रभावती यांनी अनेक तीर्थक्षेत्र केले होते. मुलांच्या चांगले संस्कार आणि शिक्षण याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, एक मुलगी, जावई, पणतू असा मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी सोमवार (दि.29) होणार असून उत्तरकार्य गुरुवार (दि.1) राहत्या घरी खालापूर येथे होणार आहे.