| पेण | वार्ताहार |
पेण तहसील कार्यालयाचे ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तहसिलदार प्रसाद कालेकर उपस्थित होते. तर पेण नगरपालिकेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते झाले. नगरपालिकेच्या ध्वजारोहणासाठी माजी नगराध्यक्षा, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. तर तहसिल कार्यालयातील ध्वजारोहणासाठी पेण तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होत. पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ.म.ना.नेने कन्याविद्यालयाच्या पटांगणावर शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तीपर गीतांचे गायन, नृत्य, लेझीम, आदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करुन जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तर ध्वजारोहन प्रा.अंजली जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा गांधी स्मारक संस्था व महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद गणपत वनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर पेण कोनायस्न्स स्कूलच्या शाळेचा ध्वजारोहण दिलीप पुनमिया यांच्या हस्ते करण्यात आला. पेण सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचा ध्वजारोहण अध्यक्ष अॅड. पी.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सार्वजनिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी पुर्ण पेण शहरात ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढली. संपूर्ण तालुक्यात मोठया उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.