| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापनदिन मोठया उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. सकाळी 7-45 वा. मुस्लीम मोहल्ला येथे छोटुभाई पानवाले यांच्या हस्ते ध्वजारोहण, संत रोहिदास नगर येथे शिवाजी साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अधीक्षक कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, तर नगरपरिषद कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळा येथे सुभेदार स्व. विनय धनावडे यांच्या शिल्पास सचिन भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, करण्यात आले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.