| पाताळगंगा | वार्ताहर |
प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद सेंट्रल स्कूल माजगाव येथे ध्वजारोहण किरण कवाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, तसेच राजकीय अशा विविध स्तरावरील मंडळी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, देशभक्ती गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी दिपाली पाटील, राजेश पाटील, संदिप धारणे, पुनम जाधव, प्रांजळ जाधव, वैशाली महाब्दि, अपर्णा शिंदे, सरिता वाघे, जयवंत पाटील, अविनाश कांबळे, किरण कवाद, भूषण पिंगळे, रेखा जाधव, मंगेश पाटील, यशवंत शिंदे, नितिन महाब्दि, विनायक गायकवाड, रणधीर पाटील, निलेश ढवालकर, गौतम कांबळे, रमेश ढवालकर, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.