| पोलादपूर | प्रतिनिधी |
मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी, (दि.07) दादर शिवाजी मंदिर हॉलमध्ये वैद्यकीय मदत कक्ष सन्मानित करण्यात आला. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष के.के.उर्फ कृष्णा कदम यांनी हा सर्व सदस्यांचा सन्मान असल्याचे नम्रपणे सांगून सत्कार स्वीकारला.
या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्रातून दोन पुरस्कार देण्यासाठी दोन संस्थाचालक निवडण्यात आले. या दोन संस्थांमध्ये कोकणी बांधवांसाठी देवदूत ठरलेल्या वैद्यकीय मदतकक्षाचा धन्वंतरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय नेते राजेश टकैत यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब जगताप, आमदार भाई जगताप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, मानपत्र व 25 हजार रुपये स्वरूपाने प्रदान करण्यात आला.