ठाणे | प्रतिनिधी |
मुंबईतील साकीनाका येथील महिला बलात्काराची घटना ताजी असतानाच आता आणखी उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ आणखी अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीला एका पडक्या खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दादा उर्फ श्रीकांत गायकवाड (30) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही शनिवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत स्कॉयवॉकवर उभी होती. यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात हातोडा मारला. त्यानंतर तिला जबरदस्तीने जवळच्या पडक्या घरात नेले. तिथे तिला डांबून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिच्या मित्रांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.