। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण येथील पंचायत समितीच्या विद्यमान सभापती रिया कांबळे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व हेल्थ अॅरड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चिकोटी बेळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहोळा संपन्न झाला. रिया कांबळे यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड असून त्या नेहमी विविध उपक्रम राबवित असतात. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व हेल्थ अॅकण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. कांबळे यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खा.बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी खा.सुधीर सावंत, गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर आदी उपस्थित होते.