| पेण | वार्ताहर |
दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरातही आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
महाशिवरात्रीचा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरातही आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरात मोठी गर्दी केली होती.
सालाबादप्रमाणे दुपारी 12 च्या सुमारास पाटणोली गावातून भोले बाबाची पालखी काढण्यात आली. ताल मृदुगांच्या गजरात 2 च्या सुमारास पालखी मंदिरात आणण्यात आली. या पालखी सोहळयासाठी पाटणोली गावातील तरूण वर्ग जरी कामा निमित्त बाहेर असले तरी ते पालखीसाठी आर्वजुन हजर राहतात आणि पालखीचा आनंद द्विगुणी करतात. यावर्षी मोठया उत्साहात तरूण वर्गांनी हरिपाठाच्या तालावर ताल धरत, नाचत, फुगडया खेळत पालखी सोहळयात रंग भरला. यावर्षी यात्रेमध्ये मोठयाप्रमाणात पाळणे, छोटया मुलांसाठी मिकी माउस, ड्रायगन ट्रोन खेळण्याच्या दुकानांसह मिठाईंची दुकान देखील मोठया प्रमाणात होती. दुपार पर्यत रायगड जिल्हयातील लाखों भाविकांनी स्वयंभू पाटणेश्वराचे दर्शन घेतले.






