| पनवेल | वार्ताहर |
पनवेलच्या बीपी मरिन अकॅडमीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाच्या अन्नाच्या सेवनामुळे पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. जेवणात अळ्या, झुरळ सापडण्याच्या प्रकारासह विद्यार्थी वारंवार अतिसाराच्या आजाराचा सामना करीत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वारंवार याच आजारांवर औषधोपचार घेत आहेत. व्यवस्थापनाच्या प्रचंड दहशतीमुळे विद्यार्थी उघडपणे याबाबत तक्रार करण्यास धजावत नाहीत.
पनवेल शहरातील बंदर रोड येथे बीपी मरिन अकॅडमीत मबीएससी इन नॉटिकल सायन्सफ आणि मजनरल पर्पज रेटिंगफ या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी 400 विद्यार्थी शिकत आहेत. बेलापूर येथे मुख्य कार्यालय असलेल्या अकॅडमीच्या पनवेल येथील बीपी मरिन अॅकॅडमीत जेवण व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन यापुढे सुधारणा करण्यात येईल. स्वच्छतेच्या बाबतही योग्य ती कार्यवाही करू. बादल सिंग, संचालक, बीपी मरिन अॅकॅडमी, पनवेल महाविद्यालयाच्या आवारात शिक्षण आणि राहण्याची सुविधा आहे. एका विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी अडीच लाख रुपयांचे शुल्क आकारले जाते. येथील वसतिगृहात देशभरातून आलेले विद्यार्थी राहतात. हे विद्यार्थी मागील दीड महिन्यांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. वारंवार जुलाब होत असल्यामुळे ते उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. विद्यार्थी याच कारणास्तव रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही जेवण आणि पाण्यामध्ये सुधारणा न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जेवणे सोडले आहे. जेवणात अळ्या, झुरळ सापडत आहेत. चपाती आणि भातात खडे लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करतात. निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळेच हा त्रास होत असल्याचे विद्याथ्यांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून होणार्या त्रासाबद्दल आवाज उठवला का नाही, असा प्रश्न विचारला असता विद्यार्थ्यांनी धक्कादायक प्रकार सांगितला, तक्रार केली तर तुम्ही नापास व्हाल, अशी धमकी दिली जाते, त्यामुळे आईवडिलांचे एवढे पैसे आणि आमचे करिअर वाया जाऊ नये म्हणून आम्ही बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी विद्याथ्यांनी वसतिगृहातील जेवणास नकार दिला असता बाहेरही जेवायला जायचे नाही, असा दम व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात याबाबत विचारणा केली असता, जुलाबाच्या कारणास्तव येथील अनेक विद्यार्थी उपचारासाठी नेहमी येत असल्याचे येथील कर्मचार्यांनी सांगितले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक सचिन सपकाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.







