| नंदुरबार | वृत्तसंस्था |
काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तीनदा उमेदवारी करून हॅटट्रिक पूर्ण केली आहे. मात्र तिन्ही वेळेस त्यांना अपयश आले.
आता त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील अपयशी हॅटट्रिकनंतर मुलगा अॅड. गोवाल पाडवी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची संधी मिळाली आहे. केवळ संधीच नव्हे, तर थेट राजकीय प्रवेशाचा श्रीगणेशा लोकसभेच्या उमेदवारीने होणे, ही गोवाल यांच्यासाठी नशीब बलवत्तर असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सर्वांत प्रथम नंदुरबार लोकसभेसाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही मुख्य पक्षाचे व मुख्य लढती असलेले उमेदवारांचे नावे घोषित झाले आहेत. या व्यतिरिक्त अजूनही काहीजण वेगवेगळ्या पक्षातर्फे, तरी काही नवसे-गवसे अपक्ष उमेदवारी करतील. त्यामुळे मागील इतिहास पाहिला तर प्रत्येक लोकसभा निवडणुकीत किमान पाच उमेदवार रिंगणात उतरलेले दिसतात.