अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग पेण मार्गावर डोलवी येथील जेएस डब्ल्यू कंपनीसमोर रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. आज संध्याकाळी या खड्ड्यात जे एस डब्ल्यू कंपनीतून कॉइल वाहून नेणारा ट्रेलर पलटी झाला आणि ट्रेलरमधील कॉइल रस्त्यावर पडल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खड्ड्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी महामार्ग विकास प्राधिकरणाकडे तक्रार केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा खड्डा वेळीच बुजवला नाही तर इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.