। रसायनी । वार्ताहर ।
किल्ले पर्यटन सेवा संशोधन केंद्र, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गं यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन व सन्मान सोहळा मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमहर्षी डॉ.दिपक परब, मानसोपचार तज्ञ हेमंत कोळंबकर यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकारीता क्षेत्रात कामगिरी करणार्या रसायनीतील पत्रकार राकेश खराडे यांना पद्मश्री परशुराम गंगावणे, अभिनेते संजय मोहिते, अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर, संगीतकार अजय नाईक, जेष्ठ साहित्यिक डॉ. अमर रसनकुटे यांच्या हस्ते कोकण पत्रकारीता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







