। नागोठणे । वार्ताहर ।
अर्नाळा विरार येथे नुकत्याच पार पडलेल्या सीकेएफ नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2024 या सपर्धेत रायगड जिल्ह्यातील मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी देशभरातून अनेक राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातील मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमीचे मास्टर कल्पेश शिंदे तसेच प्रशिक्षक रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 17 खेलाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगडच्या खेलाडूंनी 12 सुवर्ण, 9 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई करीत रायगड जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये उंचावला आहे. सिहान राजकपूर बागडी, तसेच आयोजक सेन्साई विशाल जाधव, संस्थेचे संस्थापक आहे सेंसाई कल्पेश शिंदे, प्रशिक्षक रिया पाटील यांच्या उत्तम मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. रायगडच्या यशस्वी खेळाडूंमध्ये सेंट मेरी पब्लिक स्कूल खपोली येथील मानवी तिवारी, रिहान वाणी, आरसी यादव या तिघांनी सुवर्णपदक तर नम्ब्रा खुरेशी रौप्यपदक व दक्ष पाठारे कांस्यपदक असे यश मिळविले. तसेच, नागोठण्याजवळील वणी येथील आयुष पवार याने कांस्य पदक मिळविले. नवजीवन विद्यामंदिर स्कूल इंदापूर येथील पुष्पम पवार रौप्य पदक, जिंदाल माऊंट लिट्रा झी स्कूल मधील आराध्य शिरसे व वेद खडतर यांनी सुवर्णपदक मिळविले. तर, मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू करण जाधव याने रौप्यपदक व प्रथमेश म्हात्रे याने सुवर्ण पदक मिळविले.